गंगामाई कारखाना लेटेस्ट न्यूज| गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट! कारखान्याचा मोठा भाग जळून खाक


गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट! कारखान्याचा मोठा भाग जळून खाक

 अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग अतिशय भीषण असल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाथर्डी, शेवगाव, पैठण व अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे टीम रवाना झाल्या आहेत. कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

गंगामाई कारखाना लेटेस्ट न्यूज|


गंगामाई कारखाना लेटेस्ट न्यूज| 

गंगामाई कारखान्याच्या डिसलेरी विभागाला लागलेल्या आगेमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही अशी अधिकृत माहिती कारखाना प्रशासनने दिली आहे. या घटनेत सर्व कामगार सुखरूप असून दोन ते तीन कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत. कोणीही दवाखान्यात दाखल झालेले नाही. या कारखान्यात जवळपास 35 कामगार काम करतात. मात्र पाच वाजता सुट्टी होत असल्याने अनेक कामगार बाहेर पडले होते अशी माहिती प्रशासनाकडून देण्यता आलेली आहे.

 शेती विषयी नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

 जॉईन what's app group 

शेवगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्यासुमारास मोठी आग लागली. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप धारण केले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.





Post a Comment

0 Comments