प्रधानमंत्री सन्मान निधी योजना (PM Kisan) चे 13 वा हप्ता उद्या दि:-27/02/2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे

  पीएम किसान निधील मुकणार नऊ लाख शेतकरी:

प्रधानमंत्री सन्मान निधी योजना (PM Kisan) चे 13 वा हप्ता उद्या दि:-27/02/2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे


प्रधानमंत्री सन्मान निधी योजना (PM Kisan) चे 13 वा हप्ता उद्या दि:-27/02/2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. तरी या योजने मध्ये काही शेतकऱ्यांचे #Land_Sedding_No असल्यामुळे शेतकऱ्यांना या 13 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

८१ लाख शेतकऱ्यांना उद्या मिळेल हप्ता  :\

 पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा १३ वा हप्ता येत्या सोमवारी जमा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील ८१ लाख शेतकरी पात्र ठरले आहे. १२ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा करण्यात आला होता. आधार संलग्न करणे, डीबीटीचे बँक खाते अनिवार्य करणे अशा अटींमुळे नऊ लाख शेतकऱ्यांना लाभापासून मुकावे लागणार आहे.

अद्याप काही शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बँक खात्याला जोडलेले नाही. त्यांचे बँक खाते डीबीटी (डायरेक्ट टू बैंक ट्रान्स्फर) संलग्न नसल्याने अशा खातेदारांना केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या या हप्त्यातून वगळले आहे. त्यामुळे राज्यात या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या गेल्यावेळच्या तुलनेत घटली आहे. केंद्र सरकारने या हप्त्यासाठी ई- केवायसी अनिवार्य केले होते. मात्र, ही अट आता शिथिल आली आहे. 




आधार व डीबीटी खाते संलग्न करण्यासोबतच ई केवायसी पूर्ण करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने त्यासोबतच जमिनीची माहिती जोडण्याचे कामही पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.


शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

click here to join

Post a Comment

0 Comments