LPG Cylinder Prices | एलपीजी सिलेंडरच्या किमत
१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत २०९ रु ची वाढ करण्यात आलेला आहे.
एलपीजी सिलेंडरच्या नविन किमती -
एक महत्त्वाची बातमी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 209 रुपयांची वाढ झालेली आहे मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडर मध्ये २०९ रुपयाची वाढ झालेली आहे. मुंबईत 19 किलो व्यवसायिक सिलेंडरचा दर 1684 रुपयावर पोहोचला आहे. घरगुती एलपीजी गॅस च्या किमतीत सध्या कोणताही बदल नाही मात्र आज पासून जे दर लागू होणार आहे ते घरगुती गॅस सिलेंडर मध्ये वाढ नसल्याने सर्व सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार नाही. मात्र व्यावसायिक म्हणजेच हॉटेल व्यवसायिक किंवा इतर व्यवसायिक त्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे असं म्हणता येईल कारण 209 रुपयांची ही वाढ असणार आहे. यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी व्यवसायिक एलपीजी चा तर दर हा १६८४ प्रति सिलेंडर पडणार आहे. मात्र याचबरोबर राजधानी दिल्लीमध्ये एका सिलेंडर साठी १७३१.५० मोजावे लागणार आहे. 19 किलो व्यावसायिक स्वरूपाचे सिलेंडर आहे त्यामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे आणि आणि ही वाढ आज पासून संपूर्ण देशभर म्हणजेच एक ऑक्टोबर पासून हे जे नवीन दर आहेत हे लागू केले जाणार आहे
घरगुती एलपीजीच्या किमती कधी वाढल्या?
गेल्या वर्षी ६ जुलै २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ नोंदवली होती. आजपर्यंत देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०५३ रुपये, ज्यात ५० रुपये वाढ होऊन ११०३ रुपये झाली होती. मात्र केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात ४०० रुपयांची कपात केल्यामूळे सर्वसामान्यांना 200 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहे. त्यामुळे आजरोजी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार मुंबईमधे १४.२ किलो एलपीजी सिलिंडर हा ९०२.५० ला मळत आहे .
व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत
दुसरीकडे, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढउतार सुरूच आहे. दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६९ रुपये राहिली, ज्यात मार्च २०२३ मध्ये वाढ झाली आणि दर २११९.५० रुपयांवर पोहोचली. तर एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अनुक्रमे २०२८ रुपये आणि १८५६.५० रुपयांवर घसरल्या. १ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत २०९ रु ची वाढ करण्यात आलेली आहे . लक्षात घ्या की घरगुती सिलिंडर १४.२ किलोचे, तर व्यावसायिक सिलिंडर १९ किलोचे असते.
तुमच्या शहरातील LPG गॅस सिलिंडरचा दर इथे तपासा
तुम्हाला एलपीजी सिलेंडरची किंमत तपासायची असेल, तर तुम्ही इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com/prices-of-petroleum-products वर जाऊन तपासू शकता. येथे तुम्हाला LPG व्यतिरिक्त इतर गोष्टींचे अपडेट्स देखील मिळतील
0 Comments