शेतीला तार कुपण अनुदान योजना सुरू, असा करा अर्ज | Tar Kumpan Subsidy Scheme

 शेतीला  तार  कुपण अनुदान योजना सुरू, असा करा अर्ज | Tar Kumpan Subsidy Scheme

Tar Kumpan Subsidy Scheme : शेतकरी मित्रांनो शासनाकडून आता तार कूपन योजना सुरू झालेली आहे .शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेत रस्ता वहिवाट यंत्रणा खरेदी बियाणे अशा विविध योजना बाबत अनुदान देण्यात येत असते तर आज आपण तार कंपनी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तार कुंपण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या भोवताली शेतीला लोखंडी तारकुंपण बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

तार कुंपण अनुदान योजना बद्दल माहिती

मराठवाडा व इतर काही भागांमध्ये आदिवासी भागात शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी पिकांचे जंगलातील प्राणी व पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्या साठी त्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तारकुंपण करावे लागत असतात. तर कंपनी करून शेतकऱ्यांना आपली शेतात शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता यावा यासाठी राज्य शासनाकडून आता तारकुंप अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेतून शासन शेताला भूताली काटेरी तारकुंपण लावण्यासाठी 90 टक्के अनुदान देत आहे.



तार कंपनी योजना डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे. आता शेतकऱ्यांना काटेरी तार कंपनासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

तार कुंपण अनुदान योजना ( Tar Kumpan Subsidy Scheme )

योजना संपूर्ण नाव – शेतीला तार कंपनी योजना

प्रकल्प – डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प

लाभ स्वरूप – दोन क्विंटल तर तीस सिमेंट खांब

शासन निर्णय – येथे क्लिक करून पाहू शकता


तार कुंपण अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( Documents )

  1. अर्जदारांचा आधार कार्ड ( Aadhar Card)
  2. जमिनीचा सात बारा उतारा ( Land records )
  3. जातीचा दाखला
  4. शेतमालक एका पेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा सहमतीपत्र
  5. गाव नमुना 8अ
  6. ग्रामपंचायत चा दाखला
  7. संमतीचा ठराव
  8. वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

तार कुंपण योजनेसाठी अर्ज कुठे करावा ( Where to apply ? )

तार कंपनी योजना 2023 साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल.

विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागणार आहेत.

त्यानंतर शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल निवड झाल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेसाठी अटी व शर्तीनुसार अनुदान देण्यात येईल

तर शेतकरी मित्रांनो अशाच सोप्या पद्धतीने योजनेची माहिती हवी असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर शासन निर्णय विषयी व शेती विषयक योजना विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.


Post a Comment

0 Comments